धामणगाव गवळी येथे केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन
रजत डेकाटे प्रतिनिधी
धामणगाव गवळी येथे केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन
रजत डेकाटे प्रतिनिधी
भिवापूर: धामणगांव गवळी येथील जि.प.उ.प्रा.शाळा धामणगाव गवळी शाळेच्या मैदानावर नांद केंद्र अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. यात नांद केंद्र अंतर्गत येणाऱ्या अकरा शाळामधील खेळाडू विद्यार्थी सहभागी झाले.
पंचायत समिती भिवापूरच्या सभापती सौ.माधुरीताई संजय देशमुख यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती उपसभापती श्री.राहुलजी मसराम उपसरपंच श्री.सुरेश हातबुडे बाजार समिती संचालक श्री.संजयजी देशमुख शाळा व्य.समिती अध्यक्ष श्री.रोशन मडावी ,उपाध्यक्ष सपना मिसाळ,सदस्य कल्याणी लोहंबरे ,सीमा देशमुख, मनोज मिसाळ,पंडित अथरगडे ,ग्रामपंचायत सदस्य मनोज चौधरी,शिला गुरले,धुर्वकला मिसाळ,केंद्रप्रमुख श्री.परसरामजी पिल्लेवान, मुख्याध्यापक श्री.सतीश चव्हाण ,दिवाकर गिरडकर,दिवाकर सावसाकडे, गंगाधर घोडमारे,युवराज चव्हाण,कृष्णकांत भुरे,कविता चव्हाण ,अनिल डांगे उपस्थित होते.
कबड्डी, खो खो,लंगडी ,लांब उडी,उंच उडी,धावणे ,रिले कुस्ती यासह अन्य खेळाचे सामने तसेच एकलनृत्य, समूहिक नृत्य गीतगायन स्पर्धांचे कार्यक्रम पार पडले.
क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक केंद्रप्रमुख श्री.परसरामजी पिल्लेवान यांनी केले.तर.सूत्रसंचालन श्री.सुभाष नन्नावरे यांनी केले.तर श्री.मधुकर मडावी यांनी आभार मानले.यशवितेसाठी संदीप उमाठे,भारत दडमल,मदन माटे,मदन तिजारे,सुनील राठोड, ,चेतन देवतारे,कुंदा घोडमारे,योगेश लोहंबरे,विश्रांती गजभिये,भगत मॅडम,गजानन इंगळे,वाकुडकर सर,पवार सर,लिकराम सतई सर,स्वयंपाकी,मदतनीस व गावकरी मंडळींनी सहकार्य केले.