Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

पोहे छान, त्यांना सर्वत्र मान

वसुधा नाईक धनकवडी, जि.पुणे

0 6 3 3 1 5

पोहे छान, त्यांना सर्वत्र मान

मी नाष्टा करायला घेतला.. नाष्ट्यात होते पोहे… आणि सकाळपासून आज काय लिहावे हा विचार चालू होता.. मग काय लगेच विषय मिळाला…!! ‘पोहे’ हा आपल्या रोजच्या नाष्ट्यातील अगदी साधा, पण तितकाच लोकप्रिय पदार्थ आहे. महाराष्ट्रात तर पोह्यांना विशेष मानाचे स्थान आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे केले की घरभर त्यांच्या फोडणीचा सुंदर सुगंध दरवळतो आणि भूक आणखी वाढते. कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, मोहरी, हळद आणि शेंगदाणे यांची फोडणी देऊन केलेले पोहे लिंबाचा रस आणि कोथिंबीर तसेच ओल्या खोबऱ्याचा किस याने सजवले की त्यांची चव अप्रतिम लागते. साधेपणातही किती स्वाद असू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पोहे!

घरातील सदस्यांसाठी, अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा सकाळच्या घाईच्या वेळी पोहे नेहमीच उपयोगी पडतात. कमी वेळात तयार होणारा हा पदार्थ अनेकांच्या आवडीचा आहे. मी तर म्हणेन आपले पोहे म्हणजे मॅगी आहे आजच्या काळातील. म्हणूनच “पोहे छान, त्यांना सर्वत्र मान” हे अगदी मनापासून म्हणावेसे वाटते. पूर्वीपासून ते आज पर्यंत.. कोणी पाहुणे आले की पोहे करा.

मुलीला मुलाला दाखवायचे आहे पोहे करा. चटकन ऑफिसची वेळ गाठायची आहे पोहे करा. पोटभरीचा काहीतरी हवं आहे पोहे करा. डबा करायला उशीर होतोय पोहे डब्यात भरा…अशी कितीतरी काय, काय उदाहरण देऊ की पोहे म्हणजे सर्वस्व असं झालेलं आहे. माझ्या हातचे तिखट पोहे मुलांना अजूनही आठवतात आणि आवडतात. आता माझा मुलगा सुद्धा अमेरिकेत आहे पण सुनबाईला म्हणतो आईला विचार “तिखट पोहे कसे करायचे?” (हे ती मला बोलली तरी डोळे भरून येतात. याचा अर्थ मुलांना आठवणी आहेत…)

तिखट पोहे

साहित्य – पोहे, शेंगदाणे, फोडणीचे साहित्य, कढीपत्ता, कोथिंबीर
कृती – पोहे भिजवायचे दोनच मिनिटं. कढई ठेवून तेल गरम करायला ठेवायचं. जिरे, मोहरी, हिंग, हळद टाकायचं, दाणे परतून घ्यायचे. त्याच्यातच कोथिंबीर टाकायची आणि मग पोहे लाल तिखट, मीठ, चवीला साखर टाकायची, छान परतायचे, खमंग वास येतो. चव उत्तम लागते. मॅगी सारखे पटकन होतात. पदार्थ साधा असला तरी त्याच्याशी जोडलेल्या आठवणी मात्र खास असतात. गरमागरम पोहे आणि चहा…सकाळची सुरुवातच आनंददायी करतात.

वसुधा नाईक
धनकवडी, जि.पुणे

=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 3 1 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे