युवा महोत्सवाचे विजेतेपद पटकाविल्याबद्दल जे.एस.एम. महाविद्यालयाचा विद्यापीठात गौरव
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

युवा महोत्सवाचे विजेतेपद पटकाविल्याबद्दल जे.एस.एम. महाविद्यालयाचा विद्यापीठात गौरव
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग: दि. ३०ऑगस्ट २०२६: मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये कुलगुरु मा.डाॅ. रवींद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात सोहळ्याचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेते मा. बोमन ईरानी यांच्या शुभहस्ते जे.एस.एम. महाविद्यालयास सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
५८ व्या युवा महोत्सवाचे रायगड जिल्हास्तरीय विजेतेपद पटकाविल्याबद्दल जे.एस.एम. महाविद्यालयास मुंबई विद्यापीठातर्फे गौरविण्यात आले.जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.डाॅ. ॲड. गौतम पाटील यांच्या वतीने महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, प्रा. जयेश म्हात्रे, जिल्हा समन्यवयक, (दक्षिण रायगड), प्रा. श्वेता पाटील, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक, विद्यार्थी प्रतिनिधी संयोगी नाईक, श्रेया अधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित ५८ व्या रायगड (दक्षिण विभाग) युवा महोत्सवात ३३ विद्यार्थ्यांनी २५ स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्यापैंकी तब्बल १५ स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावत जे. एस. एम. कॉलेजने दणदणीत कामगिरी करत रायगड झोन चॅम्पियनशिपवर आपली छाप उमटवली होती.



