रेग्युलस तार्याची भेट – भाग 3
वसुधा नाईक, पुणे
रेग्युलस तारा म्हणजे डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांना हस्ताक्षर मनोविश्लेषण विषयक पूर्णपणे स्वतंत्ररित्या संशोधन प्रबंधासाठी श्रीलंका ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी कडून ‘डॉक्टरेट ‘मिळालेली आहे. वंदन या ताऱ्याला. साहित्य, ज्योतिष,आणि व्यंगचित्र इत्यादी विविध क्षेत्रांसाठी त्यांना नऊ जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
सन २०१७ मधे सहा राष्ट्रांच्या वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेकर्स युनियन तर्फे टॉप 100 मधील विश्वविक्रम निर्माण केले म्हणून दिल्लीत दहा देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला,व डॉक्टरांचे नाव रेग्युलस ताऱ्यास देण्यात आले. तेव्हापासून त्यांना ‘रेग्युलस तारा’ हे नाव पडले. आकाशातील तारे हे चमचमणारे आहेत. जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत अबाधित आहेत. तसे डॉक्टर घाणेकर यांचे नाव ताऱ्याला दिल्यामुळे डॉ.घाणेकरांचे नाव अमर राहणार आहे. त्यांच्या कार्याला तोड नाहीच.
आणि त्यांच्या या कार्यात त्यांच्या सहचरणी मेघाताई यांचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे आज हे पुढे जाऊच शकत आहेत.
इतके छान कार्य त्यांच्याकडून घडले आहे. कारण घरातल्या बाई माणसाचा सपोर्ट नसेल तर पुरुष एकटा काही करू शकत नाही. त्यांच्या मुलीही खूप छान आहेत. त्यांचाही पाठिंबा सरांना आहे. ऋचा आणि तनया हे त्यांच्या मुलींची नावं आहेत. ऋचाने देखील स्वतःचे असे समाजात स्थान निर्माण केलेले आहे. रेडिओ आकाशवाणीवर तिचे कार्यक्रम होत असतात.
तनयालाही वडिलांप्रमाणे गायनाची आवड आहे. डॉक्टरांच्या विश्वविक्रमी एक पात्री कार्यक्रमाच्या ८० हजार प्रयोगांपैकी ५० हजार प्रयोग त्यांनी केवळ वंचितांसाठी केलेले आहेत. जीवनात शाश्वत आनंद ते मिळवतात. आणि हा आनंद मिळवायचा कसा हे जगाला सांगतात. हजारो तणावग्रस्तांना ते स्वतः रेकी पाठवतात. मला स्वतःला त्यांच्या रेकीमुळे बराच फायदा झालेला आहे. निरपेक्ष भावनेने केलेली कोणतेही काम त्यांना मनापासून आनंद देऊन जाते.
आनंद या जीवनाचा
सुगंधा परी दरवाळावा
पाव्यातील सुर जैसा
ओठातूनही ओघळावा….
आनंदाचा ठेवा सर्वांना देत असणाऱ्या या डॉ. ना व त्याच्या सहचरणी मेघा ताईंना माझे वंदन????????
वसुधा वैभव नाईक
धनकवडी,जिल्हा – पुणे
मो. नं. 9823582116



