‘वसुधा वैभव नाईक’ नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित
वसुधा वैभव नाईक, प्रतिनिधी पुणे
‘वसुधा वैभव नाईक’ नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित
पुण्यातील १८ महिलांना नवदुर्गा पुरस्कार
वसुधा वैभव नाईक, प्रतिनिधी पुणे
पुणे (दि ८): अरण्येश्वर नवरात्र उत्सव (ट्रस्ट), यशश्री महिला उत्सव अरण्येश्वर नवदुर्गा पुरस्कार- 2025 याचे वितरण नुकतेच झाले. माननीय सौ.अश्विनीताई नितीन कदम,( स्थायी समिती अध्यक्ष मनपा पुणे )तसेच माननीय नितीन मधुकर कदम ( स्थायी समिती सदस्य, रा. कॉ. पार्टी, शरदचंद्र पवार ) या दोघांनी मिळून आयोजन केलेल्या या नवदुर्गा पुरस्कारामध्ये एकूण 18 जणींना नवदुर्गा पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विद्याधर अनास्कर (म. रा. सहकार परिषद-अध्यक्ष, शिखर बँक)हे होते. यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले.
खालील अठरा जणींना नवदुर्गा पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले.
वसुधा नाईक,डॉक्टर कल्पना बळवंत, केतकी साठे/ कुलकर्णी, शुभदा पेंढारकर, मेधा राजपाठक, शिल्पा अंतापुरकर, ज्योती कुलकर्णी, आलापिनी निसळ, संपदा वाळवेकर, सीमा निबंधे, सबुरी लोंढे, स्नेहा राळे,डॉक्टर मयुरी वाघ,सोनिया जोशी, अर्चना मोरे,वृंदा जोशी, चेतना बिडवे. या सर्वांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या नवदुर्गांचे मनोगत झाले. मा.अश्विनीताई व मा.विद्याधर अनास्कर यांचे मौलिक मार्गदर्शन मिळाले. मा. स्वप्निल खडके यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रम बहरत गेला. या कार्यक्रमासाठी मा. राजाभाऊ साबळे,मा. राहुल डोंगरे,मा. राहुल खत्री या तिघांचेही अनमोल सहकार्य लाभले.



