
0
6
0
5
0
3
शिक्षक गौरव गीत
तूच खरा रे भारताचा आहेस शिल्पकार
शिक्षका थोर तुझा उपकार..॥धृ॥
जसे वचन तसेच वर्तन
समाज घडविसी विचारातून
बनवुनी अपुले जीवन निर्मळ,
देई जगा आकार ॥१॥
राष्ट्रभक्त हे तुझीच निर्मिती
तुझ्याच कार्ये घडली क्रांती
प्रकाशमान हा देश जाहला,
सरला अंध:कार ॥२॥
तूच बगीचा तूच माळी
संस्काराची उमललीस कळी
तुझ्या बुद्धीचे तेज आहे,
जगताचा आधार ॥३॥
भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता- उमरेड जि.नागपूर
========
0
6
0
5
0
3



