0
1
9
9
5
5
फांदीचा झुला
हिरव्यागार झाडांमधून
किलबिल पक्ष्यांची चाले
चिमणी कोकिळ मैना
एकमेकांशी बोले
या फांदीवरून त्या फांदीवर
पक्षांचा लपंडाव चाले
चिमणी बोले चिव चिव
मी तुम्हाला पकडायला येऊ
कोकिळ म्हणे कुहू कुहू
कोण कुठे सांगा पाहू
मैना जोरात शीळ घाली
सावध व्हा आता मी आली
सर्वांनी केला फांदीचा झुला
सांगा पाहू उंच कोणाचा गेला
एक दोन तीन भुर्र…..
एक दोन तीन भुर्र…
पोपट सुखदेव मस्के
ता. पंढरपूर,जि. सोलापूर
0
1
9
9
5
5