Breaking
आरोग्य व शिक्षणपश्चिम महाराष्ट्रपुणे

मुख्याध्यापिका मंजूषा लोंढे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

वसुधा वैभव नाईक, प्रतिनिधी पुणे

0 4 8 2 9 7

मुख्याध्यापिका मंजूषा लोंढे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

वसुधा वैभव नाईक, प्रतिनिधी पुणे

पुणे : (दि ११) श्री गोपाळ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मंजुषा लोंढे यांना, नुकताच मधुकर्णिका फाउंडेशन संस्थेतर्फे पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते 2025चा मधुकर्णिका आंतरराष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार जाहिररित्या प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी मधुकर्णिका फाउंडेशनच्या संस्थापक, अध्यक्ष मधुकर्णिका सारिका सासवडे , फादर पराग लोंढे, मास्टर स्तवन लोंढे, हायस्कूल मुख्याध्यापक विजय पाटील , ज्येष्ठ पत्रकार दयानंद ठोंबरे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष ॲड.खाजा शेख, शिक्षक प्रतिनिधी सचिन वाल्मिकी, आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक आणि समारोप मधुकर्णिका फाउंडेशन संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष
मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी केले. कवी नंदकिशोर गावडे यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन कवी गणपत तरंगे यांनी केले. सोहळ्याचे औचित्य साधून डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित ‘ डहाळी ‘ विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. “मुलांमधे मला सातत्याने प्रत्यक्ष परमेश्वर दिसत असल्यानेच मी मुख्याध्यापिकेची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळत असल्याचे समाधान मिळत असते.” असे सत्काराला उत्तर देताना मंजुषा लोंढे यांनी सांगितले.

” मुलांच्या माध्यमातून समाजाची सुखदुःख जाणून घेऊन समाजाला दिलासा देण्याचे मौलिक कार्य मुख्याध्यापक करत असतात. हेच योगदान मंजुषा लोंढे सातत्याने देत असतात ” असे गौरवोद्गार डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी सौ.लोंढे यांना पुरस्कार प्रदान करताना काढले. राष्ट्रहित प्रथम या भूमिकेतून प्रतिकुलतेवर मात करुन समाजासाठी निरपेक्षपणे झटणा-या त्यागी कार्यकर्त्यांना मधुकर्णिका फाउंडेशन सन्मानित करत असते, अशी सौ.लोंढे यांना पुरस्कार देण्यामागची भूमिका स्पष्ट करताना मधुकर्णिका सासवडे यांनी सांगितले.

कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणात सौ.मंजुषा लोंढे यांचा भरभरुन कार्यगौरव केला. या सोहळ्यातील आणखी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे श्रध्दा मदने,सुमैय्या शेख, पिऊन बनपट्टे ,वैष्णवी जाधव या चार चिमुकल्या विद्यार्थिनींही आपल्या लाडक्या मंजुषा लोंढे यांच्याविषयी जाहिररित्या आदर केला. गोड बोलणा-या बालांना डाॅ.घाणेकर यांनी मिठु मिठु पोपट पुरस्कार दिले.

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे