Breaking
अमरावतीई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध

नकारघंटा

सुलोचना लडवे

0 4 8 2 9 0

नकारघंटा

सवय जडली अशी
सतत नकार द्यायची
लक्षण हे तुझ्यामध्ये
कामचुकार वृत्तीची

नकारघंटा तुझी सख्या
सतत का वाजवतोस?
देणे घेणे काही नसता
उगीच तोरा मिरवतोस

बदल जरा मनोवृत्ती
झटक अंगातील आळस
वाहू दे चैतन्याचा झरा
सोड मनातील आकस

सदा न कदा आयतोबा
गिरवतोस नुसत्या रेघोट्या
भाग्य तुझे हाती तुझ्या
बदल विचारांच्या पाट्या

कर्तव्यात करतो कसूर
नाहीचा पाढा सदा सुरू
यश तेव्हाच मिळेल पदरात
होकारार्थी कर्तव्य करू

श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती
सदस्या,मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे