“नवरंग : स्त्री मनातले” भाग : 7
लेखिका: अनिता व्यवहारे, अहिल्यानगर
“नवरंग : स्त्री मनातले” भाग : 7
लेखिका: अनिता व्यवहारे, अहिल्यानगर
रंग आजचा: आत्मिक समाधानाचा
दुर्गेचे रूप सातवे करू या काल रात्रीची पूजा
देईल देवी आशीर्वाद आणि होतील पूर्ण साऱ्या मनोकामना
बल, शक्ती उत्साह देईल देवी वाढेल आनंद दुजा
मिळवू शांती काल रात्रीची करुनी आराधना
आज नवरात्रोत्सवातील ‘सातवी माळ’ या सातव्या माळेचा रंग निळा …! उत्साह, शांती अन उत्साहाचे चे प्रतीक
या दिवशी निळे वस्त्र परिधान करून आनंद साजरा करण्याचा दिवस.
पण माझ्या स्त्री मनातल्या सातव्या माळेचा आजचा रंग जरा वेगळाच…
काल रात्री नवरात्रोत्सवा निमित्त वैशाली सामंत आणि स्वप्निल बांदोडकर यांच्या गीतांचा बहारदार कार्यक्रम पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. कार्यक्रमातील गीतांचा आनंद घेत असताना ‘सुख म्हणजे काय असतं’ ते जाणवत होतं. कार्यक्रमाच्या त्या ठिकाणी असलेला तो उत्साह, झगमगाट आतिषबाजी सर्व काही पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद… रंगमंचावरील परफॉर्मन्स या सर्वांना पाहून बाहेरच जग विसरायला होत होतं…
वैशाली सामंत यांचं
ती गुलाबी हवा…..
वेडं लावी जिवा….
वेड लावून गेली होती…
त्यानंतर त्यांनी गायलेलं जे गाणं
खेळू झिम्मा ग झिम्मा ग झिम्मा गं
खेळू झिम्मा गं झिम्मा पोरी झिम्मा गं….
या गीतातून तर स्त्रियांच्या आयुष्यात त्यांना अखंड कसा झिम्मा खेळावा लागतो, याचीही जाणीव झाली. कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर एवढी गर्दी… एवढेच जणू आपले विश्व असं वाटू लागलं. मनावर समाधान, आनंद रेंगाळत होताचं पण जेव्हा गर्दी निवळली आणि त्या आभासी रंगीत विश्वातून बाहेर पडलो.तेव्हा आपलं खरं विश्वास समोर आलं.
कार्यक्रमाला उशीर झाल्याने बाहेरूनच काहीतरी खाऊन जावं म्हणून एका स्टॉल कडे वळलो. नाश्ता करत होतो तेवढ्यात एक अगदी कमी वयातली पण आई झालेली बाई छोट्या मुलीला कडेवर घेऊन आली आमच्याकडे केवलवाणी पाहू लागली..ती मुलगी तिच्या खांद्यावर झोपी गेली होती. मी थोडा वेळ दुर्लक्ष केलं… वाटलं हेच्या हातावर पाच दहा रुपये द्यावेत… पण इतक्या रात्री पैसे घेऊन ही काय करणार? आणि असं कोणाला भिकेच्या स्वरूपात पैसे द्यायचे नाहीत? हे ही मनाला चाटून गेलं. मी असा सगळा विचार करत असतानाच माझ्या मिस्टरांनी त्या स्टॉल वाल्यांना सांगितले, त्यांना एक बदाम शेक दे.. मला आश्चर्य वाटलं.. आपल्या डोक्यात का नाही आले हे सगळं? त्या स्त्री ने हे ऐकलं होतं. ती लगेच तिथेच खाली बसली. त्या छोट्या मुलीला ती उठवू लागली. तिच्या चेहऱ्यावर तो आनंद तिच्या मनाचं समाधान…
पाहून त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाण्याचे दोन थेंब देऊन गेलं..
तिथून बाहेर पडताना मात्र आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर मानसिक समाधानाच तेज विलसत होतं..
मनाला वाटून गेलं अरे हाच तर आपल्या मनातल्या सातव्या माळेचा रंग….
समाधानाचा रंग…!
नवरात्रोत्सवाच्या सर्वांना खूप शुभेच्छा
सौ अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह





