“युवापिढी घडविण्याचे शिक्षकांचे कार्य मोलाचे; राजेश उपासनी’
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
“युवापिढी घडविण्याचे शिक्षकांचे कार्य मोलाचे; राजेश उपासनी’
पुण्यात आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे.दि.6ऑक्टो (प्रतिनिधी) शिक्षक हा मनुष्य निर्माणाच्या कार्यातील सर्वात महत्वाचा घटक असून, युवकांच्या वर्तमान आणि भविष्यातील संस्कारांचा पाया आहेत. शिक्षकांच्या सक्रीय सहभागानेच राष्ट्राची पुनर्रचना होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करुन भारताची युवापिढी घडविण्याचे शिक्षकांचे कार्य मोलाचे आहे, म्हणून सर्व समाजाने शिक्षकांच्या प्रती आदरभाव व्यक्त केला पाहिजे, असे मत प्रसिद्ध उद्योगपती राजेश उपासनी यांनी व्यक्त केले. नाशिक येथील ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थेच्या राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
वसंतराव नाईक शैक्षणिक संकुल येथे नुकताच हा समारंभ साजरा झाला. ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. राजाराम गायकवाड यांनी प्रास्तविकातून संस्था परिचय करून दिला.चारुकेशी लवाटे यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. पुरस्कारार्थींचा परिचय प्रा. अनिल भंडारे यांनी करून दिला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श शिक्षक आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणारे विशेष शिक्षक यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन “आदर्श शिक्षक” पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुरस्कारार्थी डॉ. प्रवीण दाणी, निर्मला काळे, सरला तायडे, मोनिका गोडबोले, राजेंद्र चव्हाण, सुषमा वानखेडे, संध्या खरे, माधवी गावंडे, स्वप्ना वाळुंज या पुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त करून ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थेबद्दल
कृतज्ञता व्यक्त केली.
प्रा.अमोल अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव प्रदीप जगताप यांनी आभार मानले. जयश्री उपासनी, अजित ताडगे, प्रा.लक्ष्मीकांत भट,अजीत कुलकर्णी, संगीता जाधव, संदिप पवार, ओम डावरे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.



