
0
5
6
8
0
0
मोबाईलचा हट्ट
रडून रडून डोळे
झाले होते लाल
पावसात न्हाले
गोबरे गोबरे गाल
मोबाईलचा हट्ट धरुन
क्रिशू कोपऱ्यात बसली
जेवणखानं सोडून
रुसूबाई रुसली
‘माऊलीचे भूत ‘ पाहून
नाही मी घाबरणार
यू ट्यूब चालवून
नाही मी ओरडणार
खेळण्याचा मोबाईल
दिला आईने नवा
म्हणाली आता
वायफाय हवा
टपोऱ्या डोळ्यांतून
ओघळले आसू
फ्रॉक नवा मिळताच
आले खुदकन हासू
डॉ.सौ. मंजूषा साखरकर
ता.ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर
==========
0
5
6
8
0
0



