0
4
8
2
9
4
फुटलेले ढग
सांग सांग भोलानाथ
पाऊस जाईल काय?
फुटलेल्या ढगातून
पाऊस थांबेल काय?
भोलानाथ सारीकडे
पाणी साचले रे
घरा – दारात पुराचे
पाणी वाहिले रे
शेत-शिवाराची किती
हानी झाली रे
शेतकरी डोळ्यांतून
अश्रू वाही रे
भोलानाथ माझं तू
ऐकशील काय?
पावसाला जायला तू
सांगशील काय?
सौ. प्रांजली जोशी,
विरार, पालघर
=====
0
4
8
2
9
4



