Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनधाराशिवपरीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

आनंददायी शनिवार ‘वनभोजन’ एक संस्कारमय उपक्रम

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर बेडगा, जि. धाराशिव

0 4 8 2 8 6

आनंददायी शनिवार ‘वनभोजन’ एक संस्कारमय उपक्रम

भारत विद्यालय बेडगा येथे ‘शनिवार आनंददायी’ उपक्रमांतर्गत दप्तरविना वनभोजनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीत शैक्षणिक गुणवत्ता जपताना विद्यार्थ्यांचा मानसिक, सामाजिक व नैतिक विकास होणे तितकेच आवश्यक आहे. या दृष्टीने भारत विद्यालय बेडगा (ता. उमरगा, जि. धाराशिव) येथे ‘शनिवार आनंददायी’ या उपक्रमांतर्गत दप्तरविना वनभोजन या उपक्रमाचे आयोजन उत्साहात संपन्न झाले. हा आनंददायी उपक्रम बेडगा गावचे ग्रामदैवत श्री गहिनीनाथ महाराज मंदिर परिसरात अत्यंत उत्साहात पार पडला. इयत्ता पाचवी ते दहावीच्या एकूण १७७ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

उपक्रमाचा उद्देश:

१) या उपक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तणावातून मुक्त करणे.
२) निसर्गाच्या सान्निध्यात आनंददायी अनुभव देणे.
३) सहजीवन, शिस्त, स्वच्छता व सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणे.
४) शिक्षक–विद्यार्थी नात्यात स्नेह व विश्वास वाढवणे हा आहे.

प्रशालेचे नियोजन व शिक्षकांचे योगदान:

या उपक्रमाचे नियोजन प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री आर. एल. चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. डॉ. माशाळकर सर, पवार सर, मानेगोपाळे सर, पवार मॅडम, कांबळे मॅडम, सुरवसे मॅडम, योगेश सर, कुलदीप सर, विजय माने, मनोज माने, जालींदर कांबळे यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्धपणे वनभोजनाचा आनंद घेतला तसेच भोजनानंतर परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही स्वतः घेतली.

मुख्याध्यापकांचे मनोगत:

आदरणीय श्री आर. एल. चव्हाण साहेब (मुख्याध्यापक, भारत विद्यालय बेडगा) म्हणाले, “शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित नसून ते जीवनाशी जोडलेले असावे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा आनंददायी, अनुभवाधारित उपक्रमांची अत्यंत गरज आहे. ‘शनिवार आनंददायी’ उपक्रमांतर्गत आयोजित दप्तरविना वनभोजनामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाशी जवळीक साधण्याची संधी मिळाली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सहकार्य, स्वच्छता, सामाजिक जबाबदारी व आनंदी जीवनशैलीचे महत्त्व रुजते. शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक दृढ होते. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सजीव व संस्कारक्षम करण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

उपक्रमाचे शैक्षणिक महत्त्व:

१) या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला चालना मिळाली.
२) सामाजिक कौशल्यांचा विकास झाला.
३) मूल्यशिक्षणाची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली.
४) या उपक्रमांमुळे विद्यार्थी शाळेशी भावनिकरित्या जोडले जातात, हे स्पष्ट झाले.

निष्कर्ष:

भारत विद्यालय बेडगा, जि. धाराशिव येथे राबविण्यात आलेला ‘शनिवार आनंददायी’ उपक्रमांतर्गत दप्तरविना वनभोजन हा उपक्रम अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला. प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे हा उपक्रम संस्मरणीय ठरला असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
बेडगा, जि. धाराशिव
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे