Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनगोंदियाविदर्भसाहित्यगंध

कडवटता

रंजना राहुल ब्राह्मणकर अर्जुनी/मोर जि गोंदिया

0 5 1 6 5 1

कडवटता

शब्दांचे प्रेम सुर निघता
जग हे नकळत जुळते
साखळी प्रेमाची बांधते
नात्याची नाळ गुंफते
तोडून मनाची कडवटता ||१||

प्रेमाने प्रेमाचे बंद बांधते
रागाने ते दूर सारते
हेवेदावे नाहक पसरते
एकमेकांचे पाय खिचते
असेल मनात कडवटता ||२||

कानामागून येऊन तिखट
का बोललास तु फुकट
शब्दांचे बोल मोल जपत
नाहीतर कुणाशी तुझे खपत
नको ठेवू वाणीत कडवटता ||३||

उचलली जीभ लावून टाळूला
भेग पडली बघ ह्रदयाला
दोन तुकडे एक घाव मारून
दूर झाले मन जुळून
वाणीत आणून कडवटता||४||

नको केसाने गळा कापूस
गुडघ्याला बाशींग बांधूस
जीभेवर साखर पाजरूस
मनाचे मनाशी नाते जुळून
आनंदाचे क्षण घे जगून
संपवून जगातील कडवटता||५||

रंजना राहुल ब्राह्मणकर
अर्जुनी/मोर जि गोंदिया
===≠======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे