Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

सेवा, संवेदना आणि सृजन: ‘SEA-तारा’ प्रदर्शनात झळकली एका अधिकाऱ्याची कलात्मक दृष्टी

नागपूर शहर प्रतिनिधी

0 5 1 7 8 7

सेवा, संवेदना आणि सृजन: ‘SEA-तारा’ प्रदर्शनात झळकली एका अधिकाऱ्याची कलात्मक दृष्टी

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर : (दि २६) सीआरपीएफचे कमांडंट श्री जी.डी. पंढरीनाथ यांनी आयोजित केलेल्या चित्रकला आणि शायरी प्रदर्शन ‘SEA- तारा’ चे उद्घाटन 21 फेब्रुवारी रोजी, वर्धा रोडवरील लोकमत भवन येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून संदीप पाटील, भा.पु.से. विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान), नागपूर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची अध्यक्षता व मार्गदर्शन जी. डी. पंढरीनाथ, कमांडंट, सीआरपीएफ यांनी केले.

कार्यक्रमाला मान्यवर पाहुणे म्हणून संजय अग्रवाल, आयआरएस, अतिरिक्त आयुक्त, आयकर विभाग, नागपूर; डॉ. प्रविण डबली (एम.डी.-पर्यायी वैद्यक), नागपूर सदानंद उइके, विभागीय आयुक्त, नागपूर तसेच प्रणय सहाय, माजी महासंचालक, सीआरपीएफ हे विशेष उपस्थित होते या प्रदर्शनात डॉ.एम. के. सिन्हा, उप महानिरीक्षक (वैद्यकीय), संयुक्त रुग्णालय, सीआरपीएफ नागपूर तसेच हिंगणा, नागपूर परिसरातील सीआरपीएफ कार्यालयांतील अधिकारी, अधीनस्थ अधिकारी आणि जवान आपल्या कुटुंबीय व मुलांसह उपस्थित होते.

त्यांच्या उपस्थितीतून कर्तव्यनिष्ठ सेवेसोबतच सांस्कृतिक व सृजनशील उपक्रमही जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, हा संदेश देण्यात आला. हे उपक्रम संघटनात्मक एकता व मनोबल अधिक दृढ करतात. विशेष उल्लेखनीय म्हणजे, बलातील आपल्या सक्रिय व जबाबदार सेवे सोबतच जी.डी.पंढरीनाथ यांनी वेळेचे योग्य नियोजन आणि कर्तव्यपरायणतेत संतुलन राखत आपल्या भावना व अनुभवांचे चित्रांद्वारे प्रभावी चित्रण केले आहे. एक अधिकारी म्हणून व्यस्त दिनचर्येतूनही त्यांनी कलेप्रती असलेली निष्ठा जपली, जी उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली. प्रदर्शनातील पुलवामा हल्ल्यावर आधारित चित्र विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. हे चित्र अत्यंत भावनिक व हृदयस्पर्शी होते, ज्यामुळे उपस्थित कला- रसिक भावुक झाले. अनेकांनी या कलेला प्रदर्शनातील सर्वाधिक प्रभावी व संस्मरणीय कलाकृती म्हणून गौरविले. ‘SEA- तारा’ प्रदर्शनात चित्रकला आणि शायरीचा सुंदर व भावपूर्ण संगम पाहायला मिळाला. रंगांची अभिव्यक्ती आणि शब्दांची संवेदना यांचा मिलाफ प्रेक्षकांना एका वेगळ्या सृजनशील प्रवासावर घेऊन गेला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश कला, कल्पना शक्ती आणि सृजनशील अभि व्यक्तीला सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता, जेणेकरून समाजात संवेदनशीलता आणि सर्जनशील तेला प्रोत्साहन प्राप्त झाले आणि प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे