ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध
मतलबी दुनिया
पंकज रामकृष्ण चारथळ कोराडी रोड,नागपूर

0
5
1
6
4
1
मतलबी दुनिया
यत्र ,तत्र ,सर्वत्र
होऊन गलितगात्र
होतो सर्वांचा सगा
मिळाली वागणूक सावत्र
सगे- सोयरे वाटती
मार्गात पेरलेले कंटक
बोलती, बोल मधुर
निर्माण करती संकट
घायाळ झाल्या जीवाला
मलमपट्टी करती मिठाची
पाहतच आलो ,अद्यापही
रीत या निष्ठूर जगाची
प्रेमातही आज लागते
सर्वात उंच बोली
साखळी गळ्यात सोन्याची
प्रेम सागरास तितकी खोली
या मतलबी जगतात
आज -काल मन लागत नाही
करावे तरी काय मी
बुद्धीच चालत नाही
पंकज रामकृष्ण चारथळ
कोराडी रोड,नागपूर
========
0
5
1
6
4
1



