0
4
8
2
9
3
कळी
एक इवलीशी कळी
माझ्या गर्भात आली
मले फुलव म्हणाली
मले फुलव म्हणाली…
गर्भामध्ये मले ती
करी गुदगुली
होती मी खुशीत
घरी येणार छकुली….
कोण जाणे नवऱ्याच्या
मनी शंका आली
एक दिस सासूबाई
डाक्टरकडे घेऊन गेली…
घर सारे उदास
मले कळेच ना काही
जन्मदाताच म्हणे ग
मला नको ही छकुली…
गर्भातल्या कळीला
भीती बाई वाटली
शब्द ऐकून पित्याचे
मला विचारती झाली…
भुमेश्वरी सातपुते (खोंडे)
ता.उमरेड जि.नागपूर
============
0
4
8
2
9
3



