सातीर्जे येथे कुलाबा जीवन गौरव पुरस्कारांचे शानदार वितरण
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
सातीर्जे येथे कुलाबा जीवन गौरव पुरस्कारांचे शानदार वितरण
बोट दुर्घटनेमध्ये लोकांचे जीव वाचविणारे अरिफ बामणे यांचा सत्कार
आगरी समाजातील प्रथम महिला वैमानिक प्राप्ती राज ठाकूर यांच्यासह 78 जण पुरस्काराने सन्मानीत
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: स्व.मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्स्ट, भाई जगताप मित्रमंडळ व अॅड.उमेश ठाकूर मित्रमंडळ तसेच युवक काँग्रेसतर्फे यांच्या संयुक्त विदयमाने दिल्या जाणा-या कुलाबा जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण सातीर्जे येथे शानदार सोहळयामध्ये कामगार नेते आमदार भाई जगताप यांच्या हस्ते करण्यांत आले. प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस ऍड.उमेश ठाकूर यांचा त्यांच्या वाढदिवसानिमीत्त यावेळी जाहीर सत्कार करण्यांत आला. यावेळी माजी आमदार रविंद्र धंगेकर, श्रीरामपूरचे नव निर्वाचीत आमदार हेमंत ओगले, कॉंग्रेसचे प्रदेश सचिव अॅड.प्रविण ठाकूर, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष राजाभाउ ठाकूर, माजी जि.प.प्रतोद काका ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील थळे, स्व.मधुशेठ ठाकूर यांच्या पत्नी मालती ठाकूर, मिनाक्षी ठाकूर, कमल ठाकूर, जेष्ठ नेते तोडणकर गुरूजी, अॅड.प्रफुल्ल पाटील इ. उपस्थित होते.
आमदार भाई जगताप यांनी माजी आमदार स्व.मधुशेठ ठाकूर यांचे आठवणींना यावेळी उजाळा दिला. मधुशेठ ठाकूर यांचे कार्य मोठे होते येथील प्रत्येक धडपडया माणसासाठी मधुशेठ ठाकूर हे कायम प्रेरणास्थान होते व राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. समाजामध्ये रहात असताना समाजाप्रती असलेल्या बांधीलकीची जाण ठेवून कार्य करणा-या नागरिकांचा कुलाबा गौरव पुरस्कार देवून गौरव करण्याच्या कार्यक्रमाचे आमदार भाई जगताप यांनी यावेळी कौतूक केले. माजी आमदार रविंद्र धंगेकर व श्रीरामपूरचे नव निर्वाचीत आमदार हेमंत ओगले यांनी आपल्या मनोगतात थोर समाज सेविका सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेत माहिला आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. माहिलांचा सन्मान या कार्यक्रमाव्दारे होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
पुरस्कार मिळालेले मान्यवर.
प्राप्ती राज ठाकूर, आगरी समाजातील पहिली महिला वैमानीक, कु.आर्य किशोर पाटील (क्रिडा), बाळाराम नागू धनावडे (क्रिडा), मिलींद रामदास पाटील (क्रिडा), संजय मंगळ सोळंखी (क्रिडा), निकीत दत्तू राक्षीकर (क्रिडा), दर्शन अरविंद घरत, रोहीत रविंद्र कुथे, सिध्दार्थ अशोक पाटील, देवदत्त मनीष पडववळ, मयुर प्रभाकर म्हात्रे, सिध्देश शिवदास भगत, दत्ताराम लक्ष्मण तारे, रूपेश मुकूंद निर्गूण, बब्रवाहन दिगंबर गायकवाड, अजय अनंत म्हात्रे, कु. मानसी प्रदीप पाटील, कु.सुरक्षा प्रदीप थळे, करण धर्मेंद्र भगत, सतिश यशवंत भगत, मनोहर काशिनाथ पाटील, अनुष्का परमेश्वर पोले, ( सर्व क्रिडा विभाग), डॉ.सुभाष म्हात्रे (वैदयकीय), सृष्टी परशुराम धुमाळ (सामाजिक), आरिफ बामणे (सामाजिक),डॉ.अतिश अशोक म्हात्रे (सामाजिक), खेमचंद चुनीलाल मेथा, वामन काशिनाथ घरत, संतोष काशिनाथ् दिवकर, गणेश बळीराम तांडेल, रणिता जयराम ठाकूर, आनंद दत्तात्रेय भगत, काशिनाथ पाटील, प्रमोद काशिनाथ नाईक, अनंत लक्ष्मण घरत, विवेक अच्युत जोशी, अनिल दत्तात्रेय पाटील, अशोक पंढरीनाथ म्हात्रे, अशोक दामू भोईर, सर्व सामाजिक विभाग. यासह कला शैक्षणीक विभागातील नामवंतांचा सत्कार यावेळी करण्यांत आला. कार्यक्रमाचे आयोजन श्रेयस घरत, आकाश घरत, मंगेश घोणे, आकाश राणे व स्वप्नील भोईल यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनंजय भगत यांनी केले.