
0
5
4
7
2
3
बदलाची वाट
बदलाची वाट विकासाची
मिळते प्रगतीची दिशा
नवे विचार नवी उमेद
आणते आत्मविश्वासान आशा
धरून विकासाची कास
विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर
आयुष्याला प्रगतीपथावर नेऊ
श्रध्दा ठेवूनी सत्कर्मावर
बदलाचे ऋतूचक्र निसर्गाच
आनंदात स्वीकार वसुंधराचा
बदलाची वाट परिस्थितीतून
फुलून फळाफुलांचा हंगामाचा
इतिहासाचा धडा घेऊन
नव विचार चैतन्यशील
राहूनी विज्ञानाच्या सहवासात
जीवन करूया भाग्यशील
स्वत:ची सुखाची वाट स्वीकार
जगाची करूनी प्रगती
बुद्धी ,यंत्राचा वापर करून
कला, गुण,शौर्य ,धैर्य अन् संपती
कुसुम पाटील
कसबा बावडा, जि.कोल्हापूर
0
5
4
7
2
3



