0
4
8
2
9
7
जनसंवाद
जनसंवाद जर तुटला
तर माणसे दुरावतील
कदाचित जनक्षोभ मग
तुमच्या वाट्याला येईल
मतांचा जोगवा मागत
नेते दारोदारी फिरता
सत्ता हाती येता तुम्ही
जनतेकडे पाठ फिरवता
लोकही जाणून आहेत
तुमची ही चालूगिरी
पुढच्या निवडणुकीत
घरी जायची करा तयारी
जनतेशी संवाद साधून
प्रश्र्न त्यांचे जाणावे
अडचणी त्या सोडवून
पदाला तुम्ही जागावे
जनमताचा आदर करा
मजबूत होईल लोकशाही
मान वाढेल जनमनात
यशाची मिळेल ग्वाही
वृंदा (चित्रा) करमरकर
जि.सांगली
======
0
4
8
2
9
7



