
0
4
0
9
0
3
अजाण वाट
अजाण वाट असूनही
गुमान का चालतोस गड्या
मेंढरावाणीच मागोमाग
खोल गर्तेत मारतोस उड्या
डोळे असून आंधळ्यावाणी
अंधश्रद्धेची रोज गातोस गाणी
जीवंतपणी नाही केलीस सेवा
पिंडदानाचा का जपतोस ठेवा
अजाण वाट चालण्याआधी
जपून टाक पाऊल मंत्र साधा
अज्ञानाच्या या अंधकारानेच
डोक्याला अविचाराचीच बाधा
अजाण वाट चालताना सदा
सावज शोधतात स्वार्थी गिधाडं
गोड बोलूनच लुटतात घबाड
ईमान विकूनच बोलतात लबाड
अजाण वाट रे चालण्याची
उगीच करू नकोस कधी घाई
सावध चाल अजाण वाटेवर
स्वार न होता रे बेधुंद लाटेवर
संग्राम कुमठेकर
ता. जि.लातूर
0
4
0
9
0
3





