
0
4
0
9
0
3
खळी आणि तीळ
एकदा तीळ म्हणाला
गालावरील खळीला –
“का दुर्लक्षित मी राहिलो,
सांगशील का मला?”
खळी म्हणाली, “अरे, मी
असतेच असे नाहीतरी,
पण असले की ना,
सौंदर्य खुलवते गालावरी.”
तीळ म्हणतो खळीला,
“जरा सांगशील का मला,
काजळाचा टिंका गालावर
का लावतात भला?”
खळी म्हणते, “अरे तू,
सापडतोस ना मुठीत जेव्हा,
खरंच महत्त्व असतं
माझ्यापेक्षा तुझेच तेव्हा.
बघ, शिकून घे काहीतरी,
असावे कुठे अन केव्हा;
वाढते महत्त्व विचार
जरा माणसांना तेव्हा.”
डॉ. बालाजी राजूरकर
हिंगणघाट जि. वर्धा
=========
0
4
0
9
0
3





