0
4
8
3
0
0
मराठीचे वारसदार
तुम्हीच मराठीचे , वारसदार।
नका मानू मला, दत्तक कुमार।।
शब्दांची श्रीमंती, नसेना लाभली।
मिळाली मला पदराची सावली।।
अलंकार दिले, तुम्हाला दागिने।
उपमांनी माझे, रक्षिले तराणे।।
कसा लिहू मना, सजवून तसे।
सत्य झुगारून , नसे माझे ठसे।।
भाव भावनांना , ह्रदयी जपतो।
माय मराठीला , रोजच नमतो।।
ऐकून हाकेला , धावतो कुशीत।
भाळते कविता , मम ह्रदयात।।
व्रुत्त मात्रा आणि , वेलांटी उकार।
मला साथ देई , हेच उपकार।।
येता मनी शब्द , नसतो अबोल।
मराठीच माझ्या,ह्रदयात खोल।।
संस्कार करते , उराशी धरून।
पाजते मलाही,आशिष भरून।।
यमकाचे काय,सांगू मी नवल।
रंगात रंगून , शुध्दच धवल।।
गाथाही तुमची,अन ज्ञानेश्वरी।
मला आवडते, संतांची नगरी।।
गरीब श्रीमंती,नाही अभिमान।
लेकरांची माय, सर्वांना समान।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा
========
0
4
8
3
0
0



