0
4
8
2
9
3
थांगपत्ता
उमलत्या कळीचा
सुगंध दरवळला
चौफेर मनाच्या
गाभाऱ्यात मिळला…
तुझ्या मिलनास
आतुर ती अवनी
तुझ्या थांगपत्ता
नाही अद्याप भुवनी….
कासावीस जीव होई
झलक तुझी पाहण्या
डोळेभरून बघू दे
हृदय तुला वाहण्या….
अंतरीच्या तळ्यात
सख्या तुझीच मुर्ती
ग्रंथ वेडा म्हणोनी
जगी तुझीच किर्ती….
थांगपत्ता मनाचा
वादळाशी झुंजलेले
हृदयाच्या तळाशी
सार काही लपलेले…
सारिका डी गेडाम, चंद्रपूर
0
4
8
2
9
3



