0
4
8
2
9
0
प्रेमांगण
कुणी भिकारी येता दारी
आनंदावी दाण ओंजळी
असे उर दे मज देवा
स्मरण तुझे प्रभातकाळी
विकलांगांची होता भेट
काळजात उठावी कळ थेट
असे उर दे मज देवा
कणवेत ओलावा पापनकाठ
दिसता कुणी अनाथ बिचारा
कनवाळू व्हावा चेहरामोहरा
असे उर दे मज देवा
दयाभाव वसावा नित्य गहरा
जवळ येताच पश- पक्षी
मनपटली यावी हर्षित नक्षी
असे उर दे मज देवा
भूतदया जे सदाच रक्षी
चराचराचा वसे आनंदघन
अमर्याद असा हा नभागंण
असे उर दे मज देवा
सर्वांसाठी व्हावे मी प्रेमांगण
वनिता गभणे
आसगाव भंडारा
=======
0
4
8
2
9
0



