0
4
8
2
9
4
श्वासोत्सव
आधुनिकतेच्या नावाखाली
केली जातेय जंगलतोड
सत्ता टिकवून ठेवण्याची
चाललीय नुसतीच चढाओढ ॥
रुग्णालयात व्हेंटीलेटरवर
श्वासांची चाललीय घरघर
एकेक श्वास विकत घेतांना
पैशांची चाललीय तडजोड ॥
एक पेड माँ के नाम
उपक्रम राबविण्याची पाळी
आत्महत्या होतांना पाहून
रडतेय आई काळी ॥
एकेक श्वास वाचविण्यासाठी
वृक्षलागवड करूया
विद्यार्थ्यांच्या मनामनात
वृक्षसंवर्धन रुजवूया ॥
वसुधा फुलेल वनराईने
साजरा करूया वनोत्सव
जपूया निसर्गाची अमुल्य देण
चरचरात होईल श्वासोत्सव ॥
सरला टाले
राळेगाव यवतमाळ
0
4
8
2
9
4



