Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकृषीवार्ताकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

बालसंस्कार वर्गाची प्रेरणादायी क्षेत्रभेट उत्साहात संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 2 4 6 0

बालसंस्कार वर्गाची प्रेरणादायी क्षेत्रभेट उत्साहात संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

अलिबाग, दि. २९ मार्च २०२६ : आगरी समाज संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या बालसंस्कार वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी वरसोली (अलिबाग) येथील विठ्ठल रखुमाई मंदिर येथे शैक्षणिक सहल व क्षेत्रभेट उत्साहात आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, प्राचीन वारसा आणि आध्यात्मिक मूल्यांची ओळख व्हावी, तसेच त्यांच्यामध्ये संस्कारांची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सकाळी ९.३० वाजता रामनाथ येथील गावदेवी मंदिरातून सहलीस प्रारंभ झाला. आनंदी, उत्साही व शिस्तबद्ध विद्यार्थ्यांनी विठोबा देवस्थानात पोहोचून रांगेत विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिराच्या सभामंडपात सर्व विद्यार्थी एकत्र बसले असता बालसंस्कार वर्गाच्या संचालिका सौ. सुप्रिया प्रभाकर ठाकूर यांनी मंदिराचा इतिहास व धार्मिक महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी ही माहिती अत्यंत जिज्ञासेने ऐकली.

यानंतर विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरातील औषधी वनस्पतींची प्रत्यक्ष पाहणी केली. पुस्तकांमध्ये किंवा टीव्हीवर पाहिलेल्या वनस्पती प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. या अनुभवामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडली आणि निसर्गाविषयी कुतूहल वाढले.
सहल पुढे मनोरंजनात्मक वातावरणात रंगली. विद्यार्थ्यांनी नृत्य, प्रार्थना, गायन अशा विविध कलागुणांचे सादरीकरण केले. तसेच एकाग्रता, अवधान व संघभावना वाढवणाऱ्या खेळांमध्ये त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शेवटी सर्वांनी एकत्र भेळ खाऊन सहलीचा आनंद द्विगुणित केला. आगरी समाज संस्थेच्या सभासद तसेच को. ए. सो. जगदिश शाह प्राथमिक शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ. प्रमिला वैभव शेळके यांनी स्वतः उपस्थित राहून मुलांच्या अल्पोपहाराची व्यवस्था केली. यावेळी उपस्थित महिला पालकांनी उत्तम सहकार्य केले.

कार्यक्रमासाठी विठ्ठल रखुमाई देवस्थानचे ट्रस्टी श्री रमेश नाईक यांनी हॉल विनामूल्य उपलब्ध करून दिला. यावेळी आगरी समाज संस्थेचे सचिव श्री प्रभाकर ठाकूर ( ९८५०२९७५९९ ) व युवा सभासद कु. श्रेयस ठाकूर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. आगरी समाज संस्थेमार्फत “मनःशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा” प्रेरित बालसंस्कार वर्ग दर रविवारी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत ५ ते १२ वयोगटातील मुलांसाठी नियमितपणे घेतला जातो. नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झालेल्या या वर्गामध्ये चित्रकला, पाढे पाठांतर, गणपती स्तोत्र, सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. ही सहल प्रसन्न, आनंददायी व संस्कारमूल्यांनी परिपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 4 6 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे