
0
6
3
9
6
0
दीपोत्सव
उजळू या लक्ष लक्ष दीप सारे
करू या मने ही स्वच्छ सारे
निर्मळ मनाने करू या दिवाळी साजरी
दीपोत्सव हा करील तेजोमय धरती सारी
चहू दिशां प्रकाशूनी
प्रेमगंधाची करूया शिंपडण
आपुलकीच्या नात्याने माणूसपण
जपू या सारेजण
भावस्पर्शी शब्दांच्या सुंदरतेने
स्नेहमय होईल दुनिया
उधळण करीत आनंदाची
साधू या आपण ही किमया
हात देऊनी सहाय्याचा
मदत करूया गरजूंला
दिवाळी म्हणजे असतं काय
कळेल त्यासी या दिवाळीला…
मनामनांत त्याच्या पसरेल तेजोमय प्रकाश
दीपोत्सव हा घेऊन येईल त्यांचा उत्कर्ष..!
अनिता व्यवहारे
श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर
0
6
3
9
6
0



