0
4
8
3
0
0
फजिती
ऊंटाने मैत्री.. गाढवाशी केली
मैत्री त्यांची घट्ट झाली
एक दिवस गाढव बोलला…
शेतातील ऊस गोड झाला ।।
चल जाऊ… पार्टी करू
गोड ऊसावर… ताव मारू
बारी बारीने ऊस खाऊ
एक जन खाऊ… दुसर्याने लक्ष ठेऊ ।।
गाढवाने लावला पहिला नंबर
त्याने खाल्ले… ऊस पोटभर
जेव्हा ऊंट पोट… लागला भरू
गाढव लागला केकाट्या मारू ।।
शेतमालक आला धावत
ऊंटाला बाहेर काढले बदडत
ऊंटाची पक्की फजिती झाली
बोलला…मूर्खाशी संगत जिवाशी आली…..।।
कंचना मंडपे नागपूर
0
4
8
3
0
0



