Breaking
ई-पेपरकवितादेश-विदेशनागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

गजगामिनी

वृंदा(चित्रा)करमरकर

0 4 8 2 9 0

गजगामिनी

हे गजगामिनी मनमोहिनी
मनी ठसलीस गं तू राणी
तव नजाकत अशी साजणी
तू गं लावण्याची खणी

तुझी घाटदार गं काया
पाहून उडे गं मम दैना
तुझ्या रुपाला पाहूनी
कसा लाजतो बघ ऐना

अलवार तुझी चाहूल
का मना घालिते भूल
जसे डहाळीवरचे फूल
मनी गंधाचे दरवळ

स्वप्नची तू विधात्याचे
सत्यात आकारा आले
तव गालावरचे गोंदण
मन माझे तिथेच रमले

ते शब्द तव मुखीचे
जणू मधाची पोळी
तव गात्रातून वाहते
यौवनाची नशा आगळी

वृंदा(चित्रा)करमरकर
जिल्हा सांगली
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे