आज ‘स्कॉलरशीप’ चा पेपर; पाचवीचे विद्यार्थी पोहचले परीक्षा केंद्रावर
हिंगणा शहर प्रतिनिधी

आज ‘स्कॉलरशीप’ चा पेपर; पाचवीचे विद्यार्थी पोहचले परीक्षा केंद्रावर
रूम नंबर शोधण्यास पालकांची तोबा गर्दी
हिंगणा शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर/ हिंगणा: (दि २२ फेब्रुवारी): महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे तर्फे घेण्यात येत असलेल्या इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा आज (दि २२) रोजी सर्व जिल्ह्यात घेण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात हिंगणा येथील शहाकारवाडी येथील ‘सर्वोदय महाविद्यालय, हिंगणा’ या परीक्षा केंद्रावर विद्यार्थी आपल्या पालकासह पोहचले आणि रोल नंबर व रूम नंबर शोधण्यास तोबा गर्दी दिसून आली.
सर्वोदय विद्यालय या परीक्षा केंद्रावर ६ रूमची व्यवस्था केली असून प्रत्येक खोलीत ४० विद्यार्थी प्रमाणे एकूण २४० विद्यार्थी आज परीक्षा देणार आहे. परीक्षा ११ ते ३.३० पर्यंत असून पेपर क्र १ हा ११.०० ते १२.३० पर्यंत असेल तर पेपर क्र २ २.०० ते ३.३० पर्यंत आहे. पेपर १ नंतर दीड तासाचा अवशेष देण्यात आला आहे. इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी शुभेच्छा.



