0
4
8
2
9
3
हर्षवलय
आले किती वादळ वारे
डगमगली ना ही पाऊले
प्रारब्धाच्या भाळावरती
धाडसाने विजय रोवले
दग्ध निखारे वाटेवरती
पावलोपावली अंथरलेली
शिंपित चालले मीही
जल निर्धाराचे मंतरलेले
कुणी केली थट्टा मस्करी
कुणा वाटे,मी वेडावलेले
मनोबलाला घट्ट आवळून
खंजीर उपसले निर्ढावलेले
संयमाची लागली कसोटी
पण,मन नव्हतेच थकलेले
मग कुठे तेव्हा संकटे ही
दिसले मलुल झुकलेले
अवतीभवती हर्षवलय
आज दिसते हे फुललेले
त्यामागील तप्त अंगारे
जाणेल कुणी मी झेललेले?
वनिता गभणे
आसगाव,जि.भंडारा
============
0
4
8
2
9
3



