0
4
8
2
9
4
शब्दव्यूह
शब्दव्यूह भेदून, मी ओंजळीत घेतो,
वास्तवतेचं भान ठेवून कवने रचितो…
शब्द उत्पत्ती,फोड,व्याप्ती,न्ह्याळतो
शब्दाचा मतितार्थ तवा लक्ष्यात येतो…
शृंखला बनते शब्दाची, गुंफूनी घेता,
शब्दांने अर्थपूर्ण काव्यमाला विणतो…
असंख्य शब्दाचे थैमान सुरू पाहतो,
जे जे हवे मजला,तेच पारखून घेतो…
शब्दव्यूहात न अडकता सोडून घेतो,
नकोशा शब्दांना लगाम मी घालतो…
शब्दची अस्त्र, शब्दची शस्त्र मानतो,
शब्द दुधारी शस्त्र वापर मी जाणतो…
शब्दसरी बरसता, काव्य मी स्मरतो,
उपयुक्त ठरतील जे जे ते वेचून घेतो…
भावनांचा खेळ तो,शब्दात चालतो,
बोलता शब्द ओठी,नात्यात जुंपतो..
शब्दाचा दोष कधी जिभेला लागतो,
याचसाठी शब्दास जपून मी तोलतो…
बी एस गायकवाड
पालम, परभणी
0
4
8
2
9
4



