जे. एस. एम. महाविद्यालयात प्लास्टिक-मुक्ती अभियानाचा अनोखा उपक्रम
तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी
जे. एस. एम. महाविद्यालयात प्लास्टिक-मुक्ती अभियानाचा अनोखा उपक्रम
तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी
अलिबाग: (दि.१) शहरातील जे. एस. एम. महाविद्यालयाच्या एन. एस. एस. युनिटने आज अलिबाग शहरामध्ये फळविक्रेते, भाजीविक्रेते, दुकानदार, रिक्षाचालक, स्वीटमार्ट, प्रवाशी तसेच नागरिकांना कापडी पिशव्याचे वाटप करून प्लास्टिक-मुक्ती अभियानाचा अनोखा उपक्रम केला.
यावेळी एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले, डॉ. पंकज घरत व एन. एस. एस. स्वयंसेवक यांनी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अॅड. गौतम पाटील व प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक – मुक्ती व स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन केले. याप्रसंगी बोलताना, प्लास्टिक पिशव्याच्या अतिवापरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. तरी नागरिकांनी कापडी पिशव्याचा वापर करावा व प्रदूषण कमी कारण्यास हातभार लवावा असे आवाहन अॅड. गौतम पाटील यांनी केले.
प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी व विद्यार्थ्यांनी दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 दरम्यान स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत त्यापैकी हा एक स्तुत्य उपक्रम आहे ज्यामध्ये विदयार्थ्यांनी कापडी व कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण घेऊन कापडी पिशव्यांचे वाटप करून समजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
त्यानंतर एन. एस. एस. स्वयंसेवकांनी अलिबाग बाजारपेठेत फळविक्रेते, भाजीविक्रेते, दुकानदार, रिक्षाचालक, स्वीटमार्ट, प्रवासी, व नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप केले व प्लास्टिक पिशव्याचा वापर टाळावा याबाबत आवाहन केले. अलिबाग शहरातील नागरिकांनीदेखील विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.



