जि. प. व. प्रा. शाळा दिनकरनगर येथे तपासणी टीमची भेट
कर्ण सिकदार, तालुका प्रतिनिधी
जि. प. व. प्रा. शाळा दिनकरनगर येथे तपासणी टीमची भेट
तालुकास्तरीय “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” टप्पा क्र.3 अंतर्गत तपासणी
कर्ण सिकदार, तालुका प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
गोंदिया/ अर्जुनी मोर (दि २०): जि. प. व. प्रा. शाळा. दिनकरनगर ता. अर्जुनी मोरगाव येथे आज (दि २०) तालुकास्तरीय “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र.3 ” अंतर्गत शाळा तपासणी टीमने भेट देऊन तपासणी केली.
तालुकास्तरीय तपासणी टीममध्ये शिक्षण विभाग पंचायत समिती अर्जुनी/ मोर तर्फे मा. बागडे साहेब (गटशिक्षणाधिकारी पं. स. अर्जुनी/मोर) मा. लंजे सर( शिक्षण विस्तार अधिकारी), मा. भानारकर सर ( शिक्षण विस्तार अधिकारी), मा. काशिवार सर सहभागी होते.
तपासणी दरम्यान साहेबांनी शाळेबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक, श्री. जी. एस. मंडल सर, सिकदार सर, मंडल सर, व दास सर व समस्त स्वयंसेवक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.



