ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
माझी पाककला शेवग्याच्या पानांची सुकी भाजी
मीनाक्षी काटकर दारव्हा यवतमाळ
0
4
8
2
9
0
माझी पाककला
शेवग्याच्या पानांची सुकी भाजी
साहित्य: एक जुडी शेवगा पाने, एक मोठा चिरलेला कांदा, पाच ते सहा चिरलेल्या लसूण पाकळ्या, लाल मिरचीचे तिखट एक चमचा, धने जिरेपूड एक चमचा, हळद, मीठ, एक मोठा चमचा तेल, मोहरी, जिरे, दोन हिरव्या मिरच्या, शेंगदाण्याचे जाडसर कूट दोन चमचे, लिंबू रस एक चमचा, अगदी थोडी साखर, चिरलेली कोथिंबीर १वाटी इत्यादी.
कृती: पाने स्वच्छ धुवून घ्या. कढईत तेल घालून लसूण, जिरे, मोहरी, हिरवी मिरची,कांदा घालून परतून घ्या. नंतर त्यात तिखट, हळद, मीठ व पाने घालून परतून घ्या. पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या. शेंगदाण्याचे कूट, साखर, लिंबू रस, कोथिंबीर पेरून भाकरीसोबत खायला द्या.
वाढप: ही भाजी दोन जणांना पुरेल.
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
0
4
8
2
9
0



