
0
5
6
8
0
0
बैलगाडी
आली आली बैलगाडी
त्यात बसले सांगा कोण?
त्यात बसली बच्चेपार्टी
खाऊ लागले आईस्क्रीम कोन
आली आली बैलगाडी
त्यात बसले सांगा कोण?
त्यात बसले आईबाबा
आणले त्यांनी ड्रेस दोन
आली आली बैलगाडी
त्यात बसले सांगा कोण?
त्यात बसले मामा मामी
करतात सारखे फोन फोन
आली आली बैलगाडी
त्यात बसले सांगा कोण?
त्यात बसले काका काकी
करतात लेकरांचे गुणगान
आली आली बैलगाडी
त्यात बसले सांगा कोण?
त्यात बसले आजी आजोबा
त्यांच्या सोबत आहे रोहन
मीनाक्षी काटकर
जिल्हा यवतमाळ
=========
0
5
6
8
0
0



