कविताचंद्रपूरनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
भारतीय संविधान प्रा.दिनकर झाडे गडचांदूर जि.चंद्रपूर
0
4
8
2
9
4
भारतीय संविधान
धर्म पंथ जात भाषा
गुंफुनी माळेत एका
संविधाना तुझ्यामुळे
नष्ट झाला सारा हेका //१//
एक व्यक्ती एक मत
नाही अन्यायाला थारा
तुडवीत विषमता
देई समतेचा नारा //२//
संविधाना तुझ्यामुळे
आला जीवना आकार
संविधाना तुझ्यामुळे
झाले स्वप्नही साकार //३//
सारा विरोध शोषित
हित देशाचं जपलं
संपविण्या तुलाच रे
समाजकंटक टपलं //४//
जाणी; हक्क नि कर्तव्य
संविधाना तुझ्यामुळे
तरी करती विरोध
कां न अजूनही कळे //५//
उभ्या जगात वाढली
माझ्या भारताची शान
वदे डौलात तिरंगा
सखा शोभे संविधान //६//
वाचवुनी संविधाना
लोकशाही टिकवूया
भेदभाव विसरूनी
न्याय समता जपूया //७//
साऱ्या जगाहून श्रेष्ठ
भारतीय संविधान
त्याला वाचविण्यासाठी
देऊ सारे आम्ही प्राण //८//
प्रा.दिनकर झाडे
गडचांदूर जि.चंद्रपूर
0
4
8
2
9
4



