आगरी समाजाचा अभिमान फ्लाइंग ऑफिसर कौस्तुभ पाटील यांचा आगरी समाज संस्थेतर्फे गौरव
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

आगरी समाजाचा अभिमान फ्लाइंग ऑफिसर कौस्तुभ पाटील यांचा आगरी समाज संस्थेतर्फे गौरव
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग :(दि १ आॉगस्ट) संपूर्ण आगरी समाजाचा अभिमान असलेले भारतीय हवाई दलातील फ्लाइंग ऑफिसर कौस्तुभ मेहुल पाटील यांचा आज आगरी समाज संस्थेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. हा सत्कार आमदार श्री महेंद्र दळवी यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी कौस्तुभ पाटील यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांच्या कर्तृत्वाचे मनापासून अभिनंदन केले. देशसेवेच्या सर्वोच्च ध्येयासाठी केलेल्या त्यांच्या परिश्रमांचे कौतुक करताना, “कौस्तुभ यांची ही यशस्वी झेप केवळ आगरी समाजासाठीच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या कार्यातून जिल्ह्यातील युवकांना भारतीय सैन्यदलात दाखल होऊन देशसेवेची प्रेरणा मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आगरी समाज संस्थेनेही कौस्तुभ पाटील यांच्या यशाचा गौरव करत, समाजातील युवकांसाठी ते एक प्रेरणादायी आदर्श असल्याचे नमूद केले.
या सत्कार समारंभाला आगरी समाज संस्थेचे अध्यक्ष श्री निलेश पाटील, उपाध्यक्ष श्री सुनिल तांबडकर, खजिनदार श्री सचिन पाटील, सचिव श्री प्रभाकर ठाकूर, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री अनंत म्हात्रे, सल्लागार श्री शशिकांत मिठागरी, शालेय उपक्रम प्रमुख श्री मिलिंद धोदरे सर, श्री अंकुश पाटील, श्री मनोहर पाटील, श्री प्रकाश मिठागरी, अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष श्री तुषार थळे तसेच कौस्तुभ यांचे काका आणि संस्थेचे सन्माननीय सभासद श्री शैलेश पाटील उपस्थित होते.
या गौरव सोहळ्यामुळे उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असून, युवा पिढीने मोठी स्वप्ने पाहून कठोर परिश्रमाच्या बळावर देशसेवेत योगदान द्यावे, असा प्रेरणादायी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.



