
0
4
8
2
8
4
कुठे कमी पडतोय?
सुख दु:खाच्या चक्रव्यूहात
नेहमी दु:खाचे पारडे जड का होतोय?
सांग ना मी कुठे कमी पडतोय?||
सुखाची चाहूल लागताच हुरहुरतोय
स्वप्नाच्या दुनियेत रमतोय
क्षणभंगुर मृगजळाच्या मागे धावतोय
सांग ना मी कुठे कमी पडतोय?||
नाते सारीच जपतोय
का? कुणास ठाऊक
काटा पायात रुततोय
वेदना हृदयात सलताय
सांग ना मी कुठे कमी पडतोय?||
जीवापाड प्रेम ज्यावर केलंय
तोच अर्ध्यावर सोडून गेलाय
सैरावैरा मन भिरभिरतंय
सांग ना मी कुठे कमी पडतोय?||
विठ्ठल बा काळोख पुसून
भाग्य माझे उजळून
होऊ दे नशीब दैदीप्यमान
चरणी तुझ्या दंडवत वाकून
सांग ना मी कुठे कमी पडतोय?
रंजना राहूल ब्राह्मणकर
अर्जुनी/मो.जि.गोंदिया
=========
0
4
8
2
8
4



