माजी खासदार ‘संजय निरुपम’ नागपूर दौ-यावर; कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार
नागपूर शहर प्रतिनिधी
माजी खासदार ‘संजय निरुपम’ नागपूर दौ-यावर; कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज मिडीया
नागपूर: (दि १५) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हयांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या नागपुरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार संजय निरूपम हे आजपासून नागपूर जिल्ह्याच्या दौ-यावर आहे.
नागपुरात ते आज 15 एप्रिल दुपारी 12 ते 5 पर्यंत साऊथ पॉईंट स्कूल जवळ गुँड दुलारीया हॉल मानेवाडा रोड येथे दक्षिण-पश्चिम, दक्षिण, व पश्चिम नागपूर च्या कार्यकर्त्यांना, त्याचप्रमाणे 16 एप्रिल ला दुपारी 12 ते 5 मध्ये गांधीबाग बगीचा समोर जैन भवन बॅनेकवेट हाल येथे. बीएलए व ईतर महत्त्वाच्या विषयांवर कार्यकर्त्यांशी चर्चा व मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे सर्वश्री माजीमंत्री, डॉ. दीपक सावंत, माननीय मंत्री अँड.आशिष जैसवाल, आमदार कृपाल तुमाने, पूर्व विदर्भ सघंटक किरण पांडवजी, जिल्हा अध्यक्ष सूरज गोजे, व उत्तर भारतीय विदर्भ सेल समन्वयक सुमुख मिश्रा देखील उपस्थित राहणार आहेत.



