Breaking
आरोग्य व शिक्षणकविताक्रिडा व मनोरंजनचारोळीछत्रपती संभाजी नगरसाहित्यगंध

“आभारीय शब्दसुमने” वर्षा मोटे पंडीत

मराठीचे शिलेदार समूहास शब्दार्पण

0 4 8 2 9 4

“आभारीय शब्दसुमने” वर्षा मोटे पंडीत

मराठीचे शिलेदार समूहास शब्दार्पण

समूहाच्या प्रित स्पर्शाने हृदय उधाणले
समूहाच्या संगतीने जग नव्याने जाणले
होऊ ना शकेन उतराई करते शब्दार्पण
आभारीय मन माझे कृतज्ञतेचे दर्पण

“एक गाडी बाकी आनाडी” उपक्रमातील निवडीतून उमटलेले भाव. आज शब्दांना लाभलेली सन्मानाची गौरवश्री. “एक गाडी बाकी आनाडी” या चित्र चारोळी उपक्रमात माझ्या चारोळीची निवड झाली, ही माझ्यासाठी आनंदाची, स्फूर्तीची आणि अभिमानाची गोष्ट आहे. या सन्मानाने शब्दांचेच जणू आभूषण झाले आहे, आणि कल्पनेच्या कोंदणात फुललेले माझे विचार आज खऱ्या अर्थाने तेजाळले आहेत.

या उपक्रमाने शब्दांना केवळ कागदापुरते न ठेवता, त्यांना चित्रांच्या माध्यमातून नवे जीवन दिले. विचारांना रेखाटनाची जोड देऊन, काव्य व कलेचा हा सुरेख संगम अनुभवण्याची संधी लाभली.ही माझ्यासाठी अपूर्व घटना आहे. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवून त्यांना सर्वोत्कृष्टतेचा दर्जा बहाल करणाऱ्या परीक्षकांचे मनःपूर्वक आभार. या उपक्रमाने माझ्या सर्जनशीलतेला नवीन उभारी मिळेल आणि लेखनप्रवास अधिक अर्थपूर्ण होईल. मी या यशाला प्रेरणा मानून, साहित्याच्या अधिक सुंदर वाटा शोधण्याचा प्रयत्न करेन. या प्रवासात साथ दिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे ऋण व्यक्त करताना शब्द अपुरे वाटतात, परंतु मन मात्र कृतज्ञतेने ओथंबले आहे.

‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल दादा, आदरणीय पल्लवी ताई, आदरणीय सविताताई, आदरणीय वैशालीताई, आदरणीय स्वातीताई, आदरणीय वृंदाताई, आदरणीय सुधाताई, आदरणीय तारका ताई, आदरणीय शर्मिलाताई, आदरणीय संग्राम दादा, आदरणीय विष्णू दादा सर्व प्रशासक परीक्षकांचे आभार मानते. त्याचबरोबर समूहातील सर्व ताई दादांचे मनापासून आभार मानते. ज्यांनी माझ्यावर आज शुभेच्छाचा वर्षाव करून माझ्या आनंदात आणखीनच भर घातली.

कवयित्री वर्षा मोटे पंडित
छत्रपती संभाजीनगर
सदस्य मराठीचे शिलेदार समूह

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे