
0
4
0
9
0
3
बदलले ना जीवन..
कसे क्षणात बदलले हे जीवन
जगणे भासे उदासवाणे
जुन्या आठवणींचा गोतावळा
कसे सोडवावे आता गुंतणे
सभोवताली रंग मखमली
चेहऱ्यावरती साज चढेना
कुठे शोधू तूज प्रिय किरणा
एकाकी मज वाट सापडेना
रस्ता वेगळा मार्ग वेगळे
जगण्यातले का मर्म बदलले
क्षणभंगुर का हे जीवन बनले
किती नव्याने आठवणीत जगले
कुठे दिलासा कुठे आशा
सभोवताली पसरली उदास हिरवळ
गंध मातीचा विसरला जणू
कुठे शोधू तो दरवळ
एक जीव अन् जगले जगणे
पुन्हा न हे क्षण सापडणे
गेला काळ ना परते वापस
कसे थांबवू अंतरीचे रडणे
शर्मिला देशमुख -घुमरे
ता.केज जि.बीड
=========
0
4
0
9
0
3





