Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकृषीवार्ताकोकण

आगरी समाज संस्थेच्या वृक्षारोपण उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 3 0 0

आगरी समाज संस्थेच्या वृक्षारोपण उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

नारंगी (ता. अलिबाग) येथे आगरी समाज संस्था अलिबाग व ग्रामपंचायत नारंगी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात संस्थेच्या वतीने फणस, आवळा, कोकम, सिताफळ, मावा फळ, लिंबू, स्टार फ्रूट अशा एकूण ५० फळझाडांची रोपे भेट देण्यात आली.

ग्रामपंचायत नारंगीचे सरपंच श्री. उदय म्हात्रे यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या फळ रोपवाटिकेमध्ये आतापर्यंत एकूण १८८ झाडांची लागवड पूर्ण झाली असून, त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी आगरी समाज संस्थेने घेतली आहे. रोपवाटिकेतील प्रत्येक झाडाला आधार काठ्या लावण्यात आल्या असून, गुरेढोरे व बकऱ्यांपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी पुढील उपाययोजना करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री. निलेश पाटील यांनी सांगितले.

या कार्यक्रमास सरपंच श्री. उदय म्हात्रे, उपसरपंच केतन म्हात्रे, महिला सदस्य सौ गुणवंती पाटील, तसेच श्री. अनंत म्हात्रे, उपाध्यक्ष श्री. सुनील तांबडकर, सचिव श्री. प्रभाकर ठाकूर, सह-खजिनदार श्री. राजेंद्र पाटील, अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष श्री तुषार थळे, श्री. मनोहर पाटील, श्री. वैभव पाटील, सौ. सुप्रिया पाटील, दिपश्री पाटील, श्री. वेदांती म्हात्रे, कुमार म्हात्रे, सार्थक पाटील, पार्थ पाटील, सई पाटील, अद्वैत पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“झाडे लावू, निसर्ग वाचवू!” या घोषवाक्याला अनुसरून समाज व पर्यावरण रक्षणासाठी राबवलेला हा उपक्रम प्रेरणादायक ठरेल असा विश्वास अध्यक्ष निलेश पाटील यांनी व्यक्त केला. तसेच आगरी समाज संस्था अलिबाग यांनी वृक्षारोपणासोबत वृक्षसंगोपन सुद्धा करणार आहोत असा विश्वास दिल्याने सरपंच श्री उदय म्हात्रे यांनी सर्वांचे आभार मानले.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे