ऋणाभारासाठी.. दोन शब्दसरी हृदयातून.: तारका रुखमोडे
प्रा. तारका रूखमोडे अर्जुनी मोर/जि गोंदिया

ऋणाभारासाठी.. दोन शब्दसरी हृदयातून.: तारका रुखमोडे
आज माझ्या चित्र चारोळी काव्यरचनेला सर्वोत्कृष्ट यादीत सन्मानित केल्याबद्दल या शिलेदार समूहाचे कल्पवृक्ष संस्थापक, अध्यक्ष आ. राहुल सर आपले आभार कोणत्या शब्दात मानावे हा मला नेहमीच प्रश्न पडतो..कारण शिलेदारांना आनंद देणे व साहित्यिक घडावेत म्हणून सतत कार्यशील राहून भाषेसाठी अविरत परिश्रम घेणे,या आपल्या परिश्रमाला सीमाच नाही..म्हणूनच या परिश्रमापुढे मी नेहमीच नतमस्तक होते. व आभार हा शब्दच मला आपल्या कार्यापुढे थिटा वाटायला लागतो,म्हणून मी आपल्या ऋणातच राहू इच्छिते.
खरंतर पाऊस माझ्या आवडीचा अगदी लहानपणापासूनच…मला रिमझिम पावसात भिजायला खूपच आवडायचं..पावसासी संबधीत विषय आला की हात नकळत लेखणीकडे वळतात..कालही तसंच झालं..
खरंच मनाचं व घनाचं नातं अगदी घट्ट..त्याच्या येण्याची जशी धरतीला वाट असते.. तो आला की ती जशी तृप्त होते..तसंच तृषार्त मनालाही ‘त्या'( जिवलगा ) च्या येण्याची आस असते..तो आला की त्याच्या प्रीतवलयात ती न्हाऊन निघते..प्रत्येक क्षणी मन सुखावते.. म्हणून ती विरहकाळ संपण्यासाठी घनाला येण्याची याचना करते. याच दुहेरी अर्थाने लिहिलेली कालची रचना आ. परीक्षकांना भावली.. यासाठी आ. राहुल सर मी आपली आजन्म ऋणाभारात राहू इच्छिते.
तसेच सचिव आ. पल्लवीताई, प्रशासक प्रिय सविताताई, परीक्षक स्वातीताई, वृंदाताई, आ.विष्णूदादा सर्व सहप्रशासक आपणा सर्वांचे आभार मानते व माझ्यावर कौतुक वर्षाव करणाऱ्या सर्व शिलेदार सारस्वतांचे मनस्वी आभार मानते. व सह विजेत्यांचे अभिनंदन करते. आपण सर्वच माझ्या लेखणीचे उर्जा स्त्रोत आहात.. पुनश्च ऋणाभार.
प्रा. तारका रूखमोडे
अर्जुनी मोर/जि गोंदिया
सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह





