
0
4
0
9
0
3
मृत्यू
जगलो कुटुंबासाठी दिनरात्र
तिळ तिळ मात्र जळत गेलो
न सुखाची कधी अपेक्षा केली
कष्टाकरीता राबत मरत गेलो ||१||
एकेदिनी खरोखरच मरण आले
सर्वाचे फोन खणखणू लागले
झाला गलबला नातेवाईकाचा
आलेत पण कुणी नाही रडले||२||
सर्वाना लवकर प्रेत नेण्याची घाई
आंघोळीसाठी काढताच बाहेर
कुणी म्हणाले यायची आहे ताई
जागेवर मोक्षधाम ती येईल तोवर||३||
पांढऱ्या कापडात दिले ओढून
तिरडीवर ठेवण्याची लगबग
माझ्याच प्रेतासमोर कुणी वाद्य
तर कुणी फटाके फोडत गेलेत||४||
दोन पावलं सोबत चालायला नव्हे
ते आज मला खांदा देत होते
पाठीमागून करणारे तिरस्कार
स्तुती शब्द सुमने वाहत होते||५||
जळायचं राहू नये म्हणून जे अंग
ते ही लाकडानं झाकून दिले
पाठमोरे झाले मुले सर्व आपले
मी मात्र तिळ तिळ जळत गेले||६||
कुसुमलता दिलीप वाकडे
उमरेड रोड,नागपूर
0
4
0
9
0
3





