
0
4
0
9
0
3
मूठमाती
आज इथे मरणापेक्षा
जगण्याची वाटे भिती
बोथट झाल्या संवेदना
भावभावनांना मूठमाती… //
जोवर आपण देत राहू
मुक्तकंठाने गुण गाती
हात आखडता घेताच
ते पाठ फिरवून जाती… //
आपले म्हणून कुणासाठी
येथे झिजावे तरी किती
गरज सरो अन् वैद्य मरो
अशी कामापुरती निती… //
कृतज्ञता नावापुरतीच
मतलबी झालीत नाती
कृतघ्नतेची परिसिमा
टाळूवरचे लोणी खाती… //
फायद्यासाठी झुकतील
ते जशी गवताची पाती
‘तो’ मी नव्हेच म्हणतील
आवेशाने बडवून छाती… //
विष्णू संकपाळ बजाजनगर
जि. छ. संभाजीनगर
========
0
4
0
9
0
3





