Breaking
ई-पेपरकवितापरभणीमराठवाडासाहित्यगंध

अल्पायुषी

बी एस गायकवाड पालम,परभणी

0 4 8 3 0 0

अल्पायुषी

धावपळीत जीवन कवडीमोल झाले
जगणे महाग इथे,मरणे स्वस्त झाले…

हाव वाढली भलती आशा अपेक्षांची
वाहण्या भार ते,ओझे डोईजड झाले…

दगदग वाढल्याने स्पर्धेच्या युगातली
स्पर्धेमधी टिकून राहणे अवघड झाले…

ताण तणाव निर्माण, खचले मनोबल
व्यसनाधीन प्रमाण वाढून बळी झाले…

भेसळयुक्त सारेच खाण्यात येत आहे
रोगराई प्रतिबंध करणे कठीण झाले…

दळणवळण यंत्रणा वाढतीच वाहतूक
रस्ते अपघाताला जणू निमंत्रण झाले…

समाधानी वृत्ती नाही मुळी आहे त्यात
सोडून पदरचे मृगजळाची धाव झाले…

वृद्धापकाळी निधन दुर्मिळ होत आहे
जगण्याचे उम्मेदित मृत्यू सहज झाले…

गेला तो जमाना दिर्घायुषी जगण्याचा
धावत्या जगी जीवन अल्पायुषी झाले…

बी एस गायकवाड
पालम,परभणी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे