झाडे लावणे ही काळाची गरज
वसुधा नाईक प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
पुणे: युवा क्रांती ,पोलिस मित्र,वसुधा फाऊंडेशन तसेच काव्ययोग काव्य संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित झाडे लावा , झाडे जगवा या उपक्रमातून झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी संस्थेच्या वतीने तब्बल 30/40 सावली देणारे विविध झाडे लावण्यात आली.
यावेळी डॉ.राजेंद्र हेंद्रे राष्ट्रीय संघटक युवा क्रांती, सौ.वसुधा नाईक वसुधा फाऊंडेशन अध्यक्षा, मा.योगेश हरणे काव्ययोग काव्य संस्था अध्यक्ष, शितल नाईक ,रवी डिंबळे, सौ.वंदना पाटील हे सदस्य उपस्थित होते. पिंपळे गुरव – नक्षत्र वन विभागात हा उपक्रम पार पडला.
या उपक्रमातून वसुधा नाईक यांनी असा संदेश दिला ,झाडे ही काळाची गरज आहे. पुण्या सारख्या शहरात वाढत्या लोकसंख्यामुळे झाडे तोडण्यात येतात.त्यामुळे आपल्याला शुद्ध हवा मिळत नाही. शुध्द हवा मिळावी.तसेच निसर्गाचे आपण मित्र व्हावे असा संदेश दिला. पर्यावरणाचे रक्षण करावे. संत तुकाराम यांच्या अभंगानुसार वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे,वृक्षवल्ली आम्हा सोयरी! खरं तर झाडे ही आपले मित्र, नातेवाईक असतात.त्यांची जोपासना करून वेगळाच आनंद निर्माण होतो.आणि विशेष म्हणजे पावसाळ्यात झाडे लावली की लवकर वाढ होते.त्यामुळे हा उपक्रम हाती घेऊन एक वेगळा सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवला.
झाडे लावा झाडे जगवा
पर्यावरणाला हातभार लावा…
वसुधा वैभव नाईक, पुणे





